robbery in Kharghar 
मुंबई

Navi Mumbai: ज्वेलर्सचं दुकान लुटलं अन् हिरो असल्यासारखं निघून गेले; फिल्मी स्टाईल दरोडा CCTV मध्ये कैद

Movie style robbery in Kharghar Navi Mumbai: सदर दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात दाखवतात त्याच प्रमाणे हा दरोडा टाकण्यात आल्याचं दिसतंय.

कार्तिक पुजारी

नवी मुंबई- खारघरमध्ये ज्वेलरीच्या दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा टाकण्यात आला आहे. खारघर सेक्टर 35 येथील बीएम ज्वेलर्समध्ये रात्री 10 वाजता हा दरोडा टाकण्यात आलाय. सदर दरोड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटात दाखवतात त्याच प्रमाणे हा दरोडा टाकण्यात आल्याचं दिसतंय.

3 दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्सचे दुकान लुटले आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.या भीषण घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण, चोरट्यांनी अगदी बिनधास्तपणे, कोणत्याही भीतीविना हा दरोडा टाकलाय. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फरार चोरट्यांचा शोध खारघर पोलीस घेत आहेत. दरोडेखोरांनी 2 राउंड फायर देखील केल्याची माहिती आहे. चोरटे टू-व्हीलरवर दरोडा टाकण्यासाठी आले होते. त्यांनी हेलमेट घालून बीएम ज्वेलर्स दुकानात प्रवेश केला अन् त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी दुकानात असलेले दागिने लुटले आहे. एकूण किती रुपयांचा माल त्यांनी पळवलाय हे अद्याप समजू शकलेलं नाही.

दरोडा टाकल्यानंतर ते बाहेर उभे असलेल्या आपल्या टूव्हीलरवर बसले.यावेळी काहींनी त्यांच्या पाठलाग गेला. याचवेळी त्यांनी दोन राऊंड फायरिंग केली. त्यामुळे लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचं सोडून दिलं. सदर घटना अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाहीये काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT