Uran Murder case 
मुंबई

Uran Murder Case: यशश्री शिंदे प्रकरणात मोठी अपडेट, एकजण ताब्यात; दाऊद नाही तर मोहसीनने...

Navi Mumbai Uran Murder crime: मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन हा यशश्रीच्या संपर्कात असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. शेवटचं संभाषण देखील यशश्री आणि मोहसीन मध्ये झाले होते.

कार्तिक पुजारी

नवी मुंबई- उरण येथील यशश्री शिंदे हत्ये प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मोहसीन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन हा यशश्रीच्या संपर्कात असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. शेवटचं संभाषण देखील यशश्री आणि मोहसीन मध्ये झाले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

उरण येथे यशश्री शिंदे हिची हत्या दाऊद शेखने केल्याचा आरोप आहे. यशश्री दोन दिवस घरातून बेपत्ता होती. तिचा मृतदेह पोलिसांना रेल्वेस्टेशनजवळ झुडपात आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. तिच्या तोंडावर, पाठीवर, मानेवर आणि गुप्तांगावर वार झाले होते. तिचा असा मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला होता.

यशश्रीच्या वडिलांनी याप्रकरणात दाऊद शेखचे नाव संशयित म्हणून घेतले होते. दाऊद शेख हा कर्नाटकचा रहिवाशी आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. पण, अद्याप तो सापडलेला नाही. त्याआधी पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेतले आहे. यशश्री आणि मोहसीनमध्ये शेवटचे संभाषण झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी मोहसीनला ताब्यात घेतलं आहे. पण, मोहसीनचा यात काय सहभाग आहे हे अद्याप समजून शकलेलं नाही. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

यशश्री प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज समोर

यशश्री प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये दाऊद शेख हा यशश्री शिंदे हिचा पाठलाग करत असताना दिसत आहे. त्यामुळे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी हे फुटेज महत्त्वाचे ठरू शकते. यशश्री गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीशी वारंवार फोनवर बोलत होते. तो व्यक्ती दाऊद असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.

यशश्री शिंदे प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आला आहे. यामध्ये आरोपीने हत्येच्या उद्देशाने तिच्यावर वार केल्याचं समोर आलं आहे. यशश्रीवर बलात्कार झालेला नाही असं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT