Nawab Malik sakal
मुंबई

मोदी सरकार हमसे डरती है; राष्ट्रवादीचे ईडी ऑफिसजवळ आंदोलन

ईडी ऑफिस मागील राष्ट्रवादी कार्यालयाच्या खाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश

दिनेश चिलप मराठे

मुंबई : मोदी सरकार हाय हाय, अमित शाह हाय हाय,मोदी सरकार हमसे डरती है , ईडी को आगे करती है,नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत राज्याच्या अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध केला.

आज सकाळी 10 वाजल्या पासुनच ईडी कार्यालया च्या अगदी मागच्या गल्लीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयाखाली रस्त्यावर निदर्शने करीत होते.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष नीलेश भोसले,संजय कांबळे,लहू कांबळे महिला उपाध्यक्ष सुनीता शिंदे आदी कार्यकर्ता उपस्थित आहेत.पोलिसांची मोठी तारांबळ उडाली असून ईडी कार्यालयाकड़े येणाऱ्या चारही गल्ल्या कड़े पोलिसांनी बेरिकेड स लावल्याने या प्रत्येक गल्लीत प्रवेशद्वारावर लावलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता घोषणाबाजी करीत आहेत.येथे बन्दोबस्तावर असलेले झोन एक चे पोलिस उपायुक्त डॉ.हरि बालाजी एन. यांनी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. तर सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले यांची पोलिसांना कार्यकर्ते बेरिकेट्स ढकलून आत येऊ नये म्हणून त्यांना संजावित होते.

महिला पोलिस शिपाई आणि अधिकारी महिला आन्दोलकांना जागेवर थोपवून धरित आहेत. मीडियाचे छायाचित्रकार आणि कॅमेरामन एका वाहनावर उभे राहून फोटो काढ़ीत आहेत. तर ईडी ऑफिस समोर मीडियाची मोठी गर्दी असून मुख्य प्रवेशद्वारा जवळ CRPF सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स तैनात आहेत. नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असून ते बाहेर यायची पत्रकार वाट पहात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT