मुंबई

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'! मनसे नेत्याचा महाविकास आघाडीला टोला

तुषार सोनवणे

मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्यातील अनेक नागरिक आणि संघटनांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचे गऱ्हाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे मांडले आहे. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीला डिवचले आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवहार सुरळीत होण्यास अडचणी येत होत्या. अनेकांचे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले होते. तर काहींच्या वेगळ्याच समस्या होत्या. असे अनेक नागरिक आणि संघटनांनी राज ठाकरेंकडे आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धाव घेतली. गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी विशेष ट्रेन सोडण्याबाबत, वाढीव वीजबिलांबाबत, कोळी बांधवांचे प्रश्न, प्रवासी संघटना, मुंबईतील डबेवाले, विद्यार्थी - पालक समन्वय समितेचे प्रश्न, बॅंड पथक संघटना इत्यादी अनेकांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढा राज ठाकरे यांच्या समोर मांडला. राज यांनी देखील त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केलेला दिसला. त्यामुळे मनसेचे राज्यातील जनतेकडून कौतुक होत आहे.

राज यांचे निवासस्थान, कृष्णकुंज येथे कोरोना काळात अनेक संघटना आणि नागरिकांनी भेट दिली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला डिवचले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, ''समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28'' 

देशपांडे यांच्या ट्विटवर महाविकास आघाडी समर्थक नेटकरी व्यक्त होत आहेत. त्यामुळे देशपांडे यांच्या ट्विटला महाविकास आघाडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT