मुंबई

नवख्या डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार! रुग्णालयात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या डॉ़क्टरांकडे मात्र दुर्लक्ष

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नव्याने दाखल होणारे निवासी डॉक्टर आणि विशेष वैद्यकीय अधिकारी (एसएमओ) यांना भरमसाठ मानधन मिळत असल्याने पालिकेच्या मुख्य रुग्णालयातील जुन्या डॉक्टरांमध्ये नाराजीचा सूर आहे. वर्षानुवर्षे रुग्णालयांत काम करून देखील कोरोना काळात मानधन वाढ मिळत नसून मानधन वाढवून देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पत्र देखील लिहिले आहे.

पालिकेच्या मुख्य रुग्णालयात अधिष्ठात्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (एएमओ)कार्यरत असतात. दिवसपाळीसह रात्रपाळी, रुग्णांच्या समस्या यावर लक्ष ठेवण्याचे काम हे अधिकारी करतात. हे अधिकारी आपल्या जुन्याच मानधनावर काम करत आहेत.मात्र नवीन येत असलेल्या डॉक्टरांना एक लाखांहुन अधिकचे मानधन देण्यात येत असल्याने या डॉक्टरांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एएमओंसह, असिस्टंट प्रोफेसर यांच्या मानधनात वाढ होत नसून नवीन आलेल्या शिकवू डॉक्टर आणि एसएमओ यांना भरसाठ मानधन देण्यात आले आहे. मात्र 10- 12 वर्ष रुग्णसेवेत घालवली असताना त्यांना मानधन मात्र कमी मिळत आहे. आमच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत सर्व डॉक्टरांनी या आशयाचे निवेदन पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, रुग्णालय प्रशासन यांना दिले. मात्र हे निवेदन लाल फितीत अडकले असून आश्वासना पलीकडे या डॉक्टरांना काहीही मिळाले नाही असे एका एएमओ ने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.

कामावर असताना रुग्णालयांची जबाबदारी, वाढीव काम एमओंनाच करावे लागते. तर दुसरीकडे  विशेष वैद्यकीय अधिकारी कोणतेही वाढीव जबाबदारी नसते. पालिकेचे कर्मचारी पालिकेच्या वसाहतीत राहत असल्याने त्यांना त्याचे भाडे मोजावे लागते, तर हे विद्यार्थी असल्याने त्यांना भाडे द्यावे लागत नाही. तरीदेखील मुख्य पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधन वाढीचा विचार पालिकेकडून करण्यात यावा. आणि नवीन डॉक्टरच्या तुलनेत आम्हाला मानधन द्यावे अशी मागणी सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय आहे.

------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

Sakal Vidya Education Expo : करिअरच्या वाटा; ३०, ३१ मे रोजी भेटा; काळेवाडीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

SCROLL FOR NEXT