Police expose a gang involved in the Nita Ambani Junior School admission scam; main accused arrested and involved traffic constable suspended.

 

esakal

मुंबई

Nita Ambani Junior School Scam : ‘नीता अंबानी ज्युनियर स्कूल’मध्ये प्रवेशाचे आमिष दाखवून पालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Nita Mukesh Ambani Junior School Admission Scam Case : मास्टरमाइंडला अटक तर याप्रकरणात सहभाग असलेल्या पोलिस हवालदाराचेही निलंबन

Mayur Ratnaparkhe

Nita Ambani Junior School Admission Scam Exposed : मुंबईतील प्रतिष्ठित नीता अंबानी ज्युनियर स्कूलमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या एका घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. तपासात हे समोर आले आहे की, महफूज झाकी अहमद शेख उर्फ ​​राजेश कोटवानी नावाचा एक व्यक्ती पालकांना, या प्रतिष्ठित शाळेत प्रवेशाचे आश्वासन देऊन फसवत होता.  आरोपीने दोन वेगवेगळ्या पालकांकडून ९.३९ लाख आणि १५ लाख रुपयांची मागणीही केली होती.

धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण रॅकेटमध्ये वाहतूक विभागाचे हवालदार अमोल अवघडे यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पालकांना फसवण्यासाठी, ई-चालान मशीनमधून डेटा काढून त्याचा वापर केला जायचा.

प्राप्त माहितीनुसार वाहतूक हवालदार शाळेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकांवर आधारित पालकांची नावे आणि मोबाईल नंबर काढण्यासाठी ई-चालान मशीनचा गैरवापर करत असे आणि ही माहिती आरोपीला पुरवत होता. यानंतर मग या डेटाचा वापर करून आरोपी शेख पालकांपर्यंत पोहोचायचा आणि त्यांना या प्रतिष्ठित शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. एवढंच नाहीतर अनेकजण त्याच्या बोलण्याला फसले आणि आपले पैसे गमावून बसले असल्याचीही माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी शाळा प्रशासनाने पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यानंतर बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान हवालदार अमोल अवघडेची या फसवेगिरीत भूमिका असल्याचे उघड झाल्याने त्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख याच्यावर यापूर्वी अशाच अनेक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये खटला दाखल झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT