Balasaheb Thorat support Nitin Raut sakal
मुंबई

'तुम्हाला निमंत्रण नाही', काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतून मंत्री महोदय माघारी?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे नाराजीनाट्य सुरू असल्याचं समोर आलं आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. कामगार मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसोबत काँग्रेसचे बडे नेते या बैठकीला उपस्थित होते. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना संबंधित बैठकीचं निमंत्रण दिलं आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. (Nitin Raut news)

नितीन राऊत या बैठकीसाठी पोहोचले. मात्र, दरवाजातूनच माघारी फिरले. त्यामुळे काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नाराजीनाट्य दिसलं. बैठकीत सहभागी न होताच राऊत माघारी फिरल्याने त्यांच्या निमंत्रणाबाबत शंका उपस्थित होत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत आज महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. त्यावेळी हा प्रसंग घडला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू आहेत. याआधी देखील ऊर्जा मंत्र्यांच्या खात्याला अर्थमंत्री अजित पवारांनी पैसे देण्यासाठी नकार दर्शवला होता. वीजबिलाची थकबाकी देण्यासंदर्भात हा विषय ऐरणीवर आला होता. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना ऊर्जा मंत्रालयाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी पत्र लिहिलं होतं. याचसोबत राज्यातील मनपा निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती ठरवण्यावर या बैठकीत खलबतं सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT