Corona Vaccination Sakal
मुंबई

लसीकरणासाठी आता दादर फॉर्म्युला

काय आहे हा फॉर्म्युला ?

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई :कोविड प्रतिबंधक लशीसाठी आता मुंबईत दादर फॉर्म्युला (dadar forumula) तयार होत आहे. लसीकरणासाठी (vaccination) नोंदणी करु न शकणाऱ्या नागरीकांपर्यंत महानगर पालिकेचे पथक स्वत: पोहचत आहे. त्यांची नोंदणी करुन घेऊन त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथकच तयार करण्यात आले आहे. (Now dadar forumula for vaccinaton)

मुंबईतील लॉकडाऊन मध्ये शिथीलता मिळाली आहे. तिसरी लाट रोखायची झाल्यास जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र,काही वेळा नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नाही. तर,अनेक वेळा त्यांना नोंदणी करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे पालिकेच्या जी उत्तर विभागाने स्वत: नागरीकां पर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला आहे.‘ज्या पात्र नागरीकांनी आता पर्यंत लस घेतली नाही,त्यांची नोंदणी करुन त्यांचे लसीकरण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पालिकेचे पथक परीसरात फिरुन नागरीकांची नोंदणी करुन घेत आहे, असे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

न्यायालयानेही लसीकरण डोर टू डोर करण्याची सुचना केली होती. मात्र,असे लसीकरण शक्य नसल्याचे केंद्र सरकारने वेळोवेळी स्पष्ट केले. घर बसल्या थेट लसीकरण शक्य नसेल तरी पालिका आता नागरीकांची नोंदणी घर बसल्या करुन देत आहे.

फेरीवाल्यांचीही नोंदणी

फेरीवाल्यांचा रोज मोठ्या प्रमाणात नागरिकांशी संबंध येतो. तसेच त्यांचा वावरही गर्दीत असतो. त्यामुळे या विभाग कार्यालयामार्फत फेरीवाल्यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच रहिवांशांचीही नोंदणी केली जात आहे. अशा प्रकारे आता पर्यंत सहा हजाराच्या आसपास नागरीकांची नोंदणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT