मुंबई

Onion News: मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत भाजपने वाटले कांदे

सकाळ डिजिटल टीम

सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे घराघरांत पोचण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून अल्प दरात कांदे विक्री करण्यात आली. सध्या कांद्याचा दर सर्वसामान्यांना चांगलाच रडवतोय.

कांद्याच्या दराने प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. भाजपने लोकांची अडचण लक्षात घेऊन २५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकून कांद्याच्या निमित्ताने घराघरांत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रकास गंगाधरे यांनी सोमवारी मुलुंडमध्ये स्वस्तात कांदाविक्री केली. त्यामुळे किरकोळ बाजारातील ७५ रुपयांचा कांदा २५ रुपये प्रतिकिलो दरात नागरिकांना उपलब्ध झाला.

बाजारात कांद्याचे दर गगनाला भिडलेले असल्यामुळे आम्ही थेट शेतकऱ्यांकडून कांदे विकत घेऊन मुलुंडमधील विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना कांदा २५ रु. प्रतिकिलो दरात विकत असल्याचे गंगाधरे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत सुमारे २५ हजार किलो कांदा नागरिकांना विकल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी मोदी सरकारचे आभार मानले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT