Devendra-Fadnavis 
मुंबई

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवरही तोडगा - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा अधिकच्या जागा वाढवून नुकसान भरून काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

"सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथिगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, की या आरक्षणामुळे खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा, त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजनांसाठी यंत्रणा उभारण्यात येईल. राज्य शासन खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 604 अभ्यासक्रमांकरिता 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे.

या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, नेत्ररोग विशेषज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व शिष्टमंडळाचे डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार, अनिल लद्धड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT