सोमवारपासून 'ही' कटकट लागणार तुमच्या मागे! राज्य सरकारचा निर्णय... 
मुंबई

सोमवारपासून 'ही' कटकट लागणार तुमच्या मागे! राज्य सरकारचा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने सोमवारपासून (ता. 18) टोलवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने (एआयएमटीसी) विरोध केला आहे. लॉकडाऊनच्या काळात आधीच ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. अशात टोलवसुली केल्यास या व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येईल व अत्यावश्‍यक सेवा बंद होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी एआयएमटीसीने केली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात सरकारने डॉक्‍टर आणि सफाई कामगारांना 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा व इतर सुविधा पुरवल्या आहेत. त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील चालक आणि इतर कामगारांनासुद्धा सुरक्षेच्या दृष्ट्रीने सुविधा देणे आवश्‍यक होते; मात्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक करताना चालकांना अनेकदा जेवायलासुद्धा मिळाले नाही. त्यामुळे चालकांनी वाहनांना रस्त्यावर सोडून घरी जाण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणखी अडचणीत आल्याचे संघटनेने म्हटले आहे. अशा स्थितीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोजक्‍याच वाहनांवर अत्यावश्‍यक सेवेचा भार सोसत आहेत. अशा कठीण परिस्थितीत टोलवसुली पुन्हा सुरू झाल्यास राज्याच्या अत्यावश्‍यक सेवेवर परिणाम होईल, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. 

निर्णय रद्द करावा! 
एरवी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा एका फेरीमागे 18 ते 20 टक्के खर्च टोलवर होते. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय रद्द करून टोलबंदीची मुदत 3 मेपर्यंत वाढवावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT