Palghar News  sakal
मुंबई

Palghar News : मोखाडा येथे "बालगोकुळम् " कार्यक्रमाचे आयोजन ; गोकुळमात गोपी, गोपीकांनी लुटला आनंद

मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील पंचवटी धाम येथे ठाण्यातील भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने बालवाडी प्रकल्पा च्या "बालगोकुळम् " कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बालवाडीतील बालकलाकरांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आपल्या कलागुणांनी, उपस्थित मान्यवर व पालकांना मंत्रमुग्ध केले.

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील पंचवटी धाम येथे ठाण्यातील भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने बालवाडी प्रकल्पा च्या "बालगोकुळम् " कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी  बालवाडीतील बालकलाकरांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आपल्या कलागुणांनी, उपस्थित मान्यवर व पालकांना मंत्रमुग्ध केले. तसेच दहीहंडीच्या ऊपक्रमात बालकांनी गोपी आणि गोपीका बनून मनमुराद आनंद लुटला आहे. या कार्यक्रमात एक हजार  300  बालकं व त्यांचे पालक उपस्थित होते.                         

ठाण्यातील भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ हि संस्था गेली 14 वर्षांपासून मोखाडा व जव्हार तालुक्यात बाल शिक्षण,आरोग्य, पौष्टिक आहार व अनेक सामाजिक विषयावर काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात  64 बालवाड्या चालविल्या जातात. या बालवाड्यांमधून  1  हजार  334 मुलं, मुली संस्कारक्षम शिक्षण घेत आहेत. 

खोडाळा येथे बचत गट लघू उद्योग, नक्षत्र उद्यान, राम मंदिर., बालवाडी प्रशिक्षण ईमारत, निराधार आदिवासी मुलींकरीता आश्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा अमरावतकर यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप विक्रमगड विधानसभा प्रचार प्रमुख डॉ. हेमंत सवरा ऊपस्थित होते. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत अशा सेवाभावी संस्थांची आपल्या भागाला गरज असल्याचे सांगत बाल गोपाळांना व संस्थेला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा समारोपात उपस्थित महिलांना  हळदी कुंकू आणि वानं देण्यात आले. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन खोडाळा पंचवटी धाम चे प्रमुख बन्सी हमरे यांनी केले होते. कार्यक्रमास ठाणे येथून सौ.वंदना विद्वांस मडळींच्या विश्वस्त सुषमा लहाटे,  विद्या प्रभुदेसाई,.रश्मी जोशी, अंकुश अग्रवाल, केशव सृष्टी, विवेक ताम्हणकर, राहूल काणे ऊपस्थित होते. तर खोडाळा गावाचे उपसरपंच.उमेश येलमामे, माजी सभापती एकनाथ झुगरे, माजी सरपंच.मनोज कदम, गणेश औसरकर, मिलिंद काळे सारीका औसरकर, नंदा दुर्गूडे तसेच बालगोपाल व त्यांचे पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT