मुंबई

पालघर: धावत्या कारने अचानक पेट घेतला, जळत्या गाडीतून बाहेर पडले प्रवासी

प्रसंगावधान राखून भावेश पावडे आणि त्यांचे कुटुंबीय कार मधून बाहेर पडले.

नाविद शेख

मनोर: नागझरी बऱ्हाणपूर रस्त्यावरील लालोंडे गावच्या हद्दीतील चार मंदिराजवळ बुधवारी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास सीएनजी इंधनावरील धावत्या वॅगनार कारला आग (car fire) लागली होती. आगीत कार जळून खाक झाली आहे. प्रसंगावधान राखत चालक आणि प्रवाशी जळत्या कार मधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

व्यवसायाने लेबर कॉट्रॅक्टर असलेले किराट गावातील भावेश पावडे किराट गावातून त्यांच्या मालकीच्या सीएनजी इंधनावर धावणाऱ्या वॅगनार कारने बोईसरकडे जात होते. नागझरी बऱ्हाणपूर रस्त्यावर लालोंडे गावच्या हद्दीतील चार मंदिराच्या लगत त्यांच्या कारमधुन धूर येऊ लागल्यानंतर कारने पेट घेतला.

प्रसंगावधान राखून भावेश पावडे आणि त्यांचे कुटुंबीय कार मधून बाहेर पडले,त्यानंतर आगीत कार जळून खाक झाली. रस्त्याच्या मधोमध कार जळाल्याने नागझरी बऱ्हाणपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. जळती कार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT