Crime News sakal
मुंबई

Palghar Crime News: अमली पदार्थाच्या शोधासाठी शोधमोहीम जोरात

संशयास्पद पदार्थ आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Drugs Crime News: चोरट्या मार्गाने आलेल्या अमली पदार्थांची शोधमोहीम पोलिसांकडून जोरात सुरू आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्याच्या विविध पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या गावात जाऊन शोधमोहिमेला गती देण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी समुद्रमार्गे राज्याच्या लगत असलेल्या समुद्रात तस्करांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ फेकले असल्याची माहिती मिळाली होती. हा अमली पदार्थ समुद्राच्या भरतीच्या लाटेतून किनाऱ्यावर आला असून मासेमारी करणाऱ्या लोकांच्या हाती लागला आहे.

तसेच त्याची विक्रीदेखील होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या प्रत्येक गावामध्ये व पाड्यावरती पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. तसेच संशयास्पद पदार्थ आढळून आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT