मुंबई

Palghar Crime: महिलेचा प्रामाणिकपणा, दोन लाखांचा ऐवज केला परत

खातरजमा करुन सदर मुद्देमाल रोहिणी सिंग यांच्या हवाली केला आहे. शैला खाडगीर यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.|

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Palghar Crime: खोडाळा येथे रहिवासी शैला समाधान खाडगीर यांना प्रवासा दरम्यान, कसारा लोकल मध्ये एक लेडीज पर्स सापडली होती. सदर महिलेने ही पर्स खोडाळा पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे पोलिस कर्मचाऱ्यांच्या हवाली केली आहे.

या पर्स मध्ये सोने, चांदीच्या वस्तु, रोख रक्कम व मोबाईल होता. खोडाळा पोलीसांनी मोबाईल वर आलेल्या कॉलवरुन तपास काढून, शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील मुळ मुद्दे माल मालक असलेल्या रोहिणी सुरज सिंग यांना पोलीस ठाण्यात बोलावले. तसेच खातरजमा करुन सदर मुद्देमाल रोहिणी सिंग यांच्या हवाली केला आहे. शैला खाडगीर यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत खोडाळा यांच्या कडून यांच्या माहितीनुसार, शैला समाधान खाडगीर या महिलेला रेल्वे प्रवासा दरम्यान कसारा येथे एक लेडीज पर्स सापडली होती. सदर पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र - 3 तोळे, चांदीचे पैंजण 1 जोडी , जोडवी चांदीच 2 नग , लॉकेट सोन्याचे 01 ग्राम , रोख रक्कम रुपये 4 हजार , रेडमि कंपनीचा मोबाईल फोन 1 असा अंदाजे 2 ते सव्वादोन लाखांचा ऐवज मिळून आला आहे.

सोन्याचे दागिने आणि रोकड पाहून सदर महिला भयभीत झाली होती.मात्र प्रामाणिकपणा आणि भिती यामूळे सदरचा ऐवज शैलाने खोडाळा पोलिसांच्या हवाली करुन ती भितीपोटी निघून गेली होती.

दरम्यान पोलीस हवालदार संजय बागुल व पोलिस अंमलदार श्रीरंग शेळके यांनी खातरजमा करुन पर्समध्ये असलेल्या मोबाईल वर आलेल्या कॉल वरुन शहापूर ( ठाणे ) तालुक्यातील वाशिंद येथील रोहिणी सुरज सिंग यांची असल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस दुरक्षेत्र खोडाळा येथे बोलावून त्यांच्या ताब्यात मुद्दे मालासहित पर्स दिली असल्याचे खोडाळा पोलिसांनी सांगितले आहे.

महिलेच्या प्रामाणिकपणाचा सत्कार व कौतुक करणार.

मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांच्याशी संपर्क साधला असता, श्रीमती शैला समाधान खाडगीर या महिलेच्या प्रामाणिकपणाचे तोंड भरून कौतुक केले आहे. सदरची महिला ही भितीपोटी निघून गेली असली तरी तीचा यथोचित गौरव होणे आवश्यक असल्याने यथावकाश त्यांच्या प्रामाणिकपणाचा यथोचित गौरव करण्याचा मानस गिते यांनी व्यक्त केला आहे‌.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT