Mumbai Sakal
मुंबई

पालघर : वारली पेंटिंग कारागिरांसाठी क्लस्टरची उद्योग मंत्र्यांकडे मागणी

पालघर जिल्हा वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाडा : पालघर (Palghar) जिल्हा वारली (warli) चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील दिवंगत पद्मश्री जिव्या सोमा म्हसे (Jivya Soma Mhase) यांनी वारली पेंटिंग (Painting) या कलेचा प्रसार भारता (India) बाहेर करून या कलेला जगात प्रसिध्दी (Popular) मिळवून दिली. त्यांची ही कला (Art) त्यांच्या पश्चात आज अनेक शिष्यांच्या माध्यमातून पालघर (Palghar) जिल्ह्यात जोपासली जात आहे.याची दखल घेऊन शासकीय (goverment) पातळीवर अनुदान उपलब्ध करून जिल्ह्यात (District) क्लस्टर निर्माण केल्यास अनेक कारागिरांना (Employees) मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.

वारली पेंटिंगने आज जागतिक पातळीवर विविध वस्तूंच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली आहे. राष्ट्रपती भवना पासून सामान्य माणसाच्या घरातही वारली पेंटिंग दिसत आहे. केवळ चित्रातच नाही तर अनेक वस्तू वारली पेंटिंगने सजलेल्या दिसतात. कपडे, पिशव्या, फुलदाणी, लाकडी वस्तू व मातीच्या भांड्यावर वारली पेंटिंग काढलेली दिसते. घरांची सजावट करण्यात येते. अशा या सर्वानाच भुरळ घालणाऱ्या कलेचे अनेक कारागिर पालघर जिल्ह्यातील खेड्यापाड्यात आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळावा, रोजगार उपलब्ध व्हावा व वस्तू, चित्रे मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होऊन घाऊक विक्री व्हावी म्हणून केंद्रीय ऊद्योग मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

या निवेदनातून पालघर जिल्ह्यातील जव्हार किंवा विक्रमगड येथे वारली पेंटिंग कलाकारांसाठी क्लस्टर निर्माण करून देण्यात यावे. या साठी निधीची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश उर्फ बन्टी पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT