sambhaji nagar  sakal
मुंबई

Palghar News: गाव चलो अभियानातुन भाजपचा घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न !

घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार, ‘गाव चलो अभियान’ाची जोरदार अंमलबजावणी

भगवान खैरनार

Palghar News: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप ने पक्षाची धोरणे, मोदी सरकार आणि महायुती सरकार ने केलेली विकास कामे घराघरात पोहोचवण्यासाठी, तसेच सरकारी योजनांपासुन वंचित घटकांना लाभ मिळवुन देण्यासाठी  " गाव चलो अभियान " सुरू केले आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात भाजप कार्यकर्ते गाव खेड्यापाड्यातील घर न घर पिंजून काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत. दिवस आणि रात्र या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. 

      लोकसभा निवडणुकीची घोषणा, पुढील महिन्यात होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी, मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजप विविध माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामांच्या जाहीराती करत आहेत. मात्र, तळागाळापर्यंत आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी राबवलेल्या योजना तसेच राज्यातील महायुती सरकार राबवत असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यत पोहोचवण्यासाठी भाजप ने " गाव चलो अभियान " सुरू केले आहे. त्यासाठी भाजप ने आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. 

                विक्रमगड विधानसभा मतदार संघात भाजप ने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा क्षेत्रात मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांसह वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटाचा समावेश आहे. मतदार संघात  377  बुथ आहेत. या सर्व बुथ वर पोहोचण्यासाठी भाजप ने यंत्रणा ऊभारली आहे. लोकप्रतिनिधी, तालुका पदाधिकार्यांसह बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, गण, गट प्रमुख तसेच विधानसभा प्रचार प्रमुख अशी भाजप ची प्रत्येक विधानसभा निहाय यंत्रणा कार्यरत झाली आहे. यामध्ये गावपातळीवर च्या कार्यकर्त्यांना देखील महत्व आणि जबाबदारी देण्यात आली आहे. 

    खरे राजकारण आणि खरा मतदार हा गावपातळीवरच असते. हे ओळखून भाजप ने प्रचाराची रणनीती आखली आहे. त्यामुळे गाव, खेडेपाड्यात पोहोचण्यासाठी " गाव चलो अभियान " सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप ने सुरूवात केली आहे. पक्षाच्या धोरण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांकडुन घराघरात जाऊन दिली जात आहे. तसेच जे कुटुंब योजनांचा लाभ घेण्यासाठी वंचित राहिले आहेत, त्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दिवस- रात्र भाजप ची टीम काम करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT