Fraud sakal
मुंबई

Palghar News: समितीच्या धडक कारवाईने बोगस डाॅक्टरांचे धाबे दणाणले; कित्येक झाले भूमिगत!

आदिवासी भागात गाव पाड्यांमध्ये पुरेस्या वैद्यकीय सेवेचा अभाव आहे. त्याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या राज्यातील बोगस वैद्यकीय पदव्या घेऊन, त्यांनी गाव पाड्यांमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक वर्षे व्यवसाय करून त्यांनी मोठी माया देखील गोळा केली आहे.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात बोगस डाॅक्टर शोध समिती ने, बोगस डाॅक्टरांचा शोध घेऊन कारवाईचा बडगा ऊगारणे सुरू केले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दीड महिण्यात दोन बोगस डाॅक्टरांचा शोध घेऊन, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील गाव पाड्यात दुकानं मांडुन बसलेल्या बोगस डाॅक्टरांचे धाबे दणाणले आहेत. बहुतांश बोगस डाॅक्टरांनी आपली दुकाने बंद करून पळ काढुन भूमिगत झाले आहेत. 

आदिवासी भागात गाव पाड्यांमध्ये पुरेस्या वैद्यकीय सेवेचा अभाव आहे. त्याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या राज्यातील बोगस वैद्यकीय पदव्या घेऊन, त्यांनी गाव पाड्यांमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक वर्षे व्यवसाय करून त्यांनी मोठी माया देखील गोळा केली आहे. बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्याबाबत सुज्ञ नागरीकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडुन कारवाई बाबत चालढकल करण्यात येत होती. 

               अखेर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी मोखाड्यात  7  डिसेंबर ला स्वतः येऊन कारवाई केली आहे. त्यांनी बोगस डाॅक्टरचा पर्दापाश करून त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक तालुका स्तरीय बोगस डाॅक्टर शोध समिती ला, बोगस डाॅक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आहेत. दिड महिण्याच्या अंतराने  23  जानेवारी ला तालुका स्तरीय बोगस डाॅक्टर शोध समिती ने मोखाड्यातील मोरचोंडी येथील बोगस डाॅक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकुन, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या धडक कारवाई मुळे गाव पाड्यांत दुकाने थाटुन बसलेल्या बोगस डाॅक्टरांनी कारवाई चा धसका घेत, आपली दुकाने बंद करून पळ काढला आहे. बहुतांश बोगस डाॅक्टर भूमिगत झाले आहेत. 

वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यात बोगस डाॅक्टरांचा शोध घेणे सुरू केले आहे. बोगस डाॅक्टरची माहिती मिळताच, त्याची पडताळणी करून बोगस डाॅक्टर शोध समिती तेथे छापा टाकत आहेत. मोरचोंडी येथील बोगस डाॅक्टरवरील कारवाई नंतर अन्य एका बोगस डाॅक्टर ची खबर मिळाली होती. मात्र, तो डाॅक्टर दवाखाना बंद करून फरार झाला आहे. मात्र, बोगस डाॅक्टर शोध मोहीम सुरू च ठेवणार आहे. 

डाॅ. भाऊसाहेब चत्तर, तालुका वैद्यकीय अधिकारी तथा बोगस डाॅक्टर शोध समिती सचिव. 

तालुक्यात काही ठिकाणी अजुनही बोगस डाॅक्टर कार्यरत आहेत. बोगस डाॅक्टरांसह काही डाॅक्टर गरीब रूग्णांना इंजेक्शन आणि सलाईन चा डोस देत प्रत्येकी हजार ते दिड हजार रूपये घेऊन त्यांची लुट करत आहेत. त्याला पायबंद घालावा अशी तक्रार मी सर्वसाधारण सभेत केली आहे. आता पुन्हा तशी तक्रार करणार आहे. 

* हबीब शेख, जिल्हा परिषद सदस्य.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT