palghar sakal
मुंबई

Palghar News : विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या

प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी प्रभाकरचे लग्न करून देण्याची मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा -  प्रेमसंबंधात प्रेमभंग झाल्याने बारावीत शिकणार्या अर्चना ऊदार या विद्यार्थीनीवर कोयत्याने वार करून प्रभाकर वाघरे (22)  या तरुणाने तीची निर्घृण हत्या केली होती. हत्या केल्यानंतर प्रभाकर फरार झाला होता.

मोखाडा पोलिसांचे पथके त्याचा शोध घेत असताना, प्रभाकर चा गळफास घेतलेला मृतदेह तुळ्याचापाडा धरणाच्या जॅकवेल वर आज सकाळी आढळून आला आहे. प्रेमभंगातुन अर्चनाची हत्या करून प्रभाकर ने स्वतःला गळफास लावून संपविल्याचा प्राथमिक अंदाज मोखाडा पोलीसांनी व्यक्त केला आहे.

गभालपाडा आश्रमशाळेत 12 वीत शिकणाऱ्या अर्चना उदार(18) या तरुणीची शुक्रवारी सहा तारखेला ,भरदिवसा प्रेमप्रकरणातून धारधार कोयत्याने गळ्यावर वार करून प्रभाकर ने हत्या केली होती.त्या नंतर आरोपी प्रभाकर वाघेरा (22) हा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची चार पथके रवाना झाले होते.

मोखाडा पोलीसांनी त्यासाठी स्थानिकांची देखील मदत घेतली. तपास सुरू असताना प्रभाकर च्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅम येथील जॅकवेल च्या लोखंडी गेट ला  गळफास लावलेला त्याचा मृतदेह आढळून आला आहे.  रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याचे सकाळी  7  ला उघडकीस आले आहे.अशी माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे.

प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी प्रभाकरचे लग्न करून देण्याची मागणी केली होती. मात्र उदार कुटुंबीयांनी अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मोखाड्यात महाविद्यालयीन तरूणांमध्ये प्रेम प्रकरणातून गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढत असल्याने, पालकांची चिंता वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT