Dhamni Dam rain सकाळ
मुंबई

Palghar Rain : धामणी धरण 100%भरले

जिल्ह्यातील महत्त्वाचे मोठे धामणी धरण 100% भरल

महेंद्र पवार

पालघर : जिल्ह्यातील महत्त्वाचे मोठे धरण असणारे धामणी आज 14जून रोजी 100%भरले असून धरणाचे पाच ही दरवाजे  हे 100 सेंटीमीटर ने उघडले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत असल्याने तसेच धामणी व कवडास या दोन्ही धरणांचे मिळून 48330 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत असल्याने प्रशासना तर्फे सूर्या नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.कोणीही नदी किनारी मासेमारी किंवा शेतकामाला जाऊ नये.

धामणी धरणाची एकूण पाणी पातळी 118.60 मिटर असून 273.759 द. ल.घ. मी,पाणी साठा ची आहे सद्या धामणी धरण 114.40मिटर तर 221.50द. ल. घ. मी पाणी साठा आहे.हे धरण 100%भरले आहे.यातून धामणी तुन 12900क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर कवडास धरण 66.90मिटर असून यात पाणी साठा 9.960द. ल.घ. मी.आहे.ते सुद्धा100%भरले आहे.

जिल्ह्यातील या दोन्ही धरणातून डहाणू,विक्रमगड, पालघर तालुक्यातील शेकडो गावांना सिंचना साठी पाणी सोडले जाते,उजवा कालवा व डावा कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो त्यातून 14.600 हेक्टर शेती सिंचना खाली येते, या मुळे येथील शेतकरी उन्हाळी हंगामाचे मोठया प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात.त्याच प्रकारे वसई,विरारमहानगरपालिका ,बोईसर ,तारापूर औधोगिक वसाहत, डहाणू अदानी प्रकल्प येथे पिण्याचे पाणी पुरविले  जाते,सद्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणी साठ्यात मोठया प्रमाणात वाढ होत आहे.धामणी धरण भरल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

कोट धामणी धरण 14जून ला पूर्ण भरले होते. तेव्हा13रोजी रात्री तीन दरवाजे उघडले होते.तर 14जून ला सकाळी 8.30ला पांच दरवाजे 100सेंटीमीटर ने उघडले आहेत. सद्या,धरण क्षेत्रात मोठा पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणात केला जात आहे. पाटबंधारे विभाग, अभियंता धामणी धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

SCROLL FOR NEXT