Fire sakal
मुंबई

Cylinder Blast : ऑक्सिजन सिलेंडर स्फोटाने बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत भीषण आग

परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का होते? या प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधींकडून संताप व्यक्त केला जातो आहे.

मुंबई महापालिकेच्या साईबाबा स्कूल या पाच मजली पालिका शाळेत आज सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास तळमजल्यावर कोविड कालावधीतील असलेले ऑक्सिजन सिलेंडरचे स्फोट होऊन गाद्या आणि इतर सामानाला आग लागली. पाच ते सहा सिलेंडरचे स्फोट एका मागोमाग झाल्याने बाजूच्या वसाहतींतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा कोविडसाठी वापरण्यात आली होती. शाळा धोकादायक झाल्याने मागील दोन वर्षापासून बंद होती. या शाळेचा कोविडमध्ये वापर करण्यात आला होता. त्यानंतर ही शाळा धोकादायक असल्याने बंद होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते, याच सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आतमध्ये असलेल्या गाद्यांनी पेट घेतला आणि आग वाढत गेल्याचे स्थानिक रहिवाशी, लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा धोका टळला. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान सिंलेंडरचा स्फोट कशामुळे झाला याची अधिक चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जाते आहे.

पालिकेच्या साईबाबा मनपा शाळेत कोविड कालावधीतील असलेले ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आले होते. गाद्या आणि इतर सामानाला प्रचंड आग लागून सिलेंडरचे स्फोट झाले आणि मोठी आग लागली. सुदैवाने सदर शाळा धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आलेली होती. तीन-चार वर्षांपासून सदर शाळा गोडाऊन म्हणून वापरण्याचे काम मुंबई महानगरपालिकेचे सुरू होते.

सोमवारी या शाळेत आगीची घटना घडून मोठे नुकसान झाले. सदर शाळा लवकरात लवकर पाडून नवीन शाळा बांधण्यात यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती लाइटिंग यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी वापरल्या जात आहेत, परंतु देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत हे या मुंबईचे दुर्दैव आहे.

- अनिल कोकीळ, स्थानिक माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT