Nitesh Rane 
मुंबई

१५ कोटींचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कुणासाठी? नितेश राणेंचा सवाल

"शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीची देखभाल महापालिका कर्मचारी करु शकतात. तर पेंग्वीनची का नाही?

दीनानाथ परब

मुंबई: पेंग्वीनच्या मुद्यावरुन (Penguin row) आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्यावर निशाणा साधला आहे. "पेंग्वीनच्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला" असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. "२०१७-१८ या आर्थिक वर्षात पर्यटकांची संख्या १७ लाख ५७ हजार ०५९ होती. पण मागच्या दोन वर्षात पर्यटकांचा (tourist) आकडा कमी झाला आहे. आता ती संख्या १० लाख ६६ हजार ३६ झाली आलीय. त्यामुळे तीन वर्षात पर्यटकांची संख्या तीन लाखाने घटलीय" असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटलं आहे.

"महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले, असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. २०१० पर्यंत राणीबागेत प्रवेश शुल्क ५ रुपये होते. पण त्यानंतर आपण हे शुल्क पाच रुपयावरुन ५० रुपयावर नेलं. या वाढीव शुल्कामुळे महसूल वाढलाय. पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढलेलं नाही" असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

"शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीची देखभाल महापालिका कर्मचारी करु शकतात. तर पेंग्वीनची का नाही? हा १५ कोटींचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कोणासाठी?" असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. "राणीची बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करुन जाण्याचे ठिकाण होते. पण एका पेंग्वीनच्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकिट दर लावून हिरावून घेतले" अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT