Lockdown sakal media
मुंबई

20 % पुरुषांनी लाॅकडाऊनमध्ये केला स्वयंपाक; धूम्रपान, मद्यपानही सोडले

'लिटिल थिंग्ज वी डू' सर्वेक्षणातील निष्कर्ष

कृष्णा जोशी

मुंबई : मागीलवर्षीच्या कडक लॉकडाऊनमध्ये (Corona Lockdown) मिळालेल्या वेळेचा फायदा घेऊन लोकांनी व्यायामाची सवय (Exercise) लावली, तसेच धुम्रपान, अति खर्चिकपणा, फास्ट फूड आणि मद्यपान (Smoking and Alcohol) आदी चुकीच्या सवयी सोडल्याचे (bad habits) एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. तर वीस टक्के पुरुषांनी स्वयंपाक (Cooking) करण्यास सुरुवात केल्याचेही यात आढळून आले आहे. ( people did exercise, cooking, left smoking alcohol drink good habits in lockdown )

या काळात लोकांनी समाजसेवा, पर्यावरणाची जपणूक, वृक्षारोपण ही उपयोगी कामे अगदी निष्काम कर्मयोग्याप्रमाणे केली, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. गोदरेज समूहातर्फे केलेल्या 'लिटिल थिंग्ज वी डू' या सर्वेक्षणात या गमतीदार बाबी आढळून आल्या आहेत. मागील वर्षीच्या या काटेकोर लॉकडाऊनला वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हाताळले, असेही यात दिसून आले. या कालावधीदरम्यान तरुण आणि मध्यमवयीन नागरिकांनी गरजूंसाठी समाजसेवा केलीच पण निम्म्याहून अधिक तरुणांनी आपण पर्यावरणाप्रती सजग असल्याचे दाखवून दिले. अनेकांनी तर घरापासून सुरुवात करताना घरातही चांगली झाडे लावली तसेच आपण खरेदी करत असलेल्या उपकरणांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो यालाही महत्व दिले.

साठ टक्के तरुणांनी या काळात निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योगा, झुम्बा, चालणे किंवा ध्यानधारणा यासारखा शारीरिक वा मानसिक व्यायामांवर भर दिला. तर सगळ्याच वयोगटातील काही लोकांनी धुम्रपान, अति खर्चिकपणा, फास्ट फूड आणि मद्यपान या गोष्टी सोडल्या. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे घरचे पौष्टिक अन्न खाल्ले गेले याबद्दलही अनेकजण समाधानी होते. या साथरोगाच्या काळात सर्वच वयोगटातील लोकांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आपल्या आयुष्यात छोटे छोटे बदल केले. 86 टक्के लोकांनी हात धुणे व गोष्टी निर्जंतुक करणे यावर भर दिला. 27 टक्के लोकांनी कुटुंबाला जास्त वेळ दिला तर 23 टक्के लोकांनी वाचनात किंवा संगीत ऐकण्यात वेळ घालवला. पाचपैकी एका पुरुषाने सकारात्मक उर्जा मिळविण्यासाठी स्वयंपाक करण्यासही सुरुवात केली, अशी माहिती गोदरेजचे उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे समूह प्रमुख (ग्रुप हेड) सुजित पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT