Devendra Fadnavis Sakal
मुंबई

PM Modi in Mumbai: एक ट्रेन साईबाबा तर दुसरी आई भवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी; फडणवीसांचे गौरवोद्गार

महाराष्ट्र रेल्वेसाठी बजेटमध्ये १३ हजार कोटींची तरतूद केल्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे उपस्थित होते. यावेळी या वंदे भारत ट्रेनबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीसांनी गौरवोद्गार काढले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "वंदे भारत एक्सप्रेस हे एक आश्चर्य आहे. अशी ट्रेन भारतामध्ये चालेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. ही ट्रेन आता मुंबई ते शिर्डी साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी धावेल. तर दुसरी ट्रेन आईभवानी, सिद्धरामेश्वर, विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी धावेल."

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "भाविक आणि प्रवाशांसाठी ही ट्रेन मैलाचा दगड ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राला रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करतो."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT