मुंबई

Eknath Shinde: वन ट्रीलियन डॉलरचे गाेल महाराष्ट्र साध्य करणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्राचा आर्थिक उद्दिष्ट: शिंदे यांच्या विश्वासातून एक लाख कोटी डॉलरांची धाव

शर्मिला वाळुंज

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच ट्रीलियन डॉलरचे ध्येय साध्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यापैकी एक ट्रीलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे केला.

निती आयोगाने मुंबई एमएमआरडीए रिजनमध्येच एक ट्रीलीयन डॉलरची क्षमता आहे. तर महाराष्ट्रात किती असेल या गोष्टीचाही उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.

कल्याण पश्चिमेतील फडके मैदान येथे क्रेडाई एमसीएचआय संघटनेच्या वतीने 13 व्या प्रापर्टी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी भेट दिली. या प्रसंगी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 9 मीटर रस्त्यालगत असलेल्या इमारतीना आठ माळ्याची परवानगी द्यावी अशी मागणी एमसीएचआयने यावेळी केली. या मागणीला मान्यात देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. पुढे बोलताना कल्याण डोंबिवलीत क्लस्टरची गरज आहे. त्यामध्ये बिल्डरांनी सहभागी व्हावे असे आवाहन एमसीएचआयला केले.

प्रॉपर्टी एक्सपोला जुन्या काळातील गाण्याची मुख्यमंत्र्यांना आठवण

कल्याण मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जुन्या काळातील "दो दिवाने शहर मे, खाब दाना धुंडते, आशियाना धुंडते है" या जुन्या गाण्याची आठवण झाली.

त्याचबरोबर महाराष्ट्र हे पहिलं असे राज्य आहे जिथे क्लस्टर योजना सुरू झाली. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना सुरू झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत देखील क्लस्टरची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बांधकाम व्यवसायिकांना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: नागपुरात सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचा समर्थनात तरुणाई एकत्र

SCROLL FOR NEXT