crime news mumbai Burglary accused arrested sakal
मुंबई

Mumbai Crime News : पोलीस अधिकाऱ्यावरच केला ब्लेडने हल्ला ; आरोपी अटकेत

Chinmay Jagtap

Mumbai Crime News: कफ परेड परिसरात शनिवारी रात्री पोलिस उपनिरीक्षकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुलाम मुस्तफा शेखला अटक केली असून आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

जखमी पोलिस उपनिरीक्षक रूपेशकुमार भागवत कफ परेड पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी शेखला ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

जखमी पोलिस अधिकाऱ्यावर या घटनेनंतर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपी गुलाम मुस्तफा शेख वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात असल्याची माहिती कफ परेड पोलिसांना मिळाली होती. त्या वेळी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक गेले असता आरोपीने ब्लेड काढून धाक दाखवत धमकी दिली.

पोलिस त्याला ताब्यात घेत असताना त्याने भागवतांवर ब्लेडने हल्ला केला. त्यात भागवत यांच्या हाताला तीन ते चार जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी आरोपी शेखला अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी हत्या, पोलिसांवर हल्ला व अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसून त्याला उपचारासाठी ठाणे येथील मध्यवर्ती मनोरुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT