विरार ः नंदन पाटील यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना मान्यवर. 
मुंबई

शिक्षक हा हाडाचा साहित्यिक ः कवी अशोक बागवे

सकाळ वृत्तसेवा

विरार ः शिक्षक हा हाडाचा साहित्यिक असतो म्हणूनच तो मुलांवर चांगले संस्कार करू शकतो. साहित्य क्षेत्रात अशा शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यातच आता नंदन पाटील यांचेही नाव घ्यावे लागेल. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. म्हणूनच त्यांच्या हातून चांगली साहित्यसेवा घडत आहे. यापुढेही त्यांनी असेच लिहित राहावे, असे आवाहन साहित्यिक कवी अशोक बागवे यांनी येथे केले. 

विरारमध्ये जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी नंदन पाटील यांनी लिहिलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेत लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या वेळी साहित्यिक, कवी बागवे बोलत होते.

कार्यक्रमास हिंदी साहित्यिका शाकुंतल पांडे, माजी महापौर राजीव पाटील, डिम्पल प्रकाशनचे अशोक मुळे, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे, पुस्तकाच्या प्रकाशिका शालिनी पाटील आदी उपस्थित होते. नंदन पाटील यांनी प्रास्ताविकातून आपला लेखनप्रवास उपस्थितांसमोर उलगडला.

पाटील यांचे विद्यार्थी, हितेंद्र ठाकूर, राजीव पाटील यांनी आपले गुरू पाटील यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सरांच्या हातून राजकीय विषयावरही लेखन व्हायला हवे, असा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. शालिनी पाटील आणि निनाद पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रा. बिना पाटील यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Nepal Dispute: भारत-नेपाळ संबंधांमध्ये मोठी हालचाल! बालेन शहा सरकार भारतासमोर ४ अटी ठेवणार; आणखी एक मोठा राजनैतिक डाव

नाना पाटेकरांनी खरंच कानाखाली मारली मग मी पण दिली एक ठेवून... अभिनेत्रीने सांगितला 'यशवंत' सिनेमाचा किस्सा

Mumbai Crime: पाच महिन्यांनी हत्येचा उलगडा, नाल्याच्या चेंबरमध्ये आढळला कुख्यात गँगस्टरचा सांगाडा

Police Recruitment : आंबेगाव तालुक्याच्या दुष्काळग्रस्त वडगावपीर गावातील निकिता आदक हिची जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात निवड

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

SCROLL FOR NEXT