rajesh tope sakal
मुंबई

13 देशातील नागरीक सक्तीने क्वारन्टाईन, आरोग्यमंत्री म्हणाले...

ओमकार वाबळे

देशासह महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना जगात नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलंय. दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटमुळे सध्या पुन्हा कोरोनाचा धोका वाढल्याचं चित्र आहे. WHOने या व्हेरिएंटला ओमिक्रॉन नाव दिलं असून हा व्हेरिएंट अन्य कोरोनापेक्षा पाच पटींनी जास्त पसरत असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासन यंत्रणा सतर्क केली आहे. यासाठी त्यांनी संसर्गाविरोधात कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली असून यामध्ये कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर चर्चा होणार आहे.

आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली होती. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यामार्फत संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यासाठी लोकांचं ट्रेसिंग आणि त्याच्यावर वेळेत उपचार करणं आवश्यक आहे. प्रवाशांची तपासणी आणि क्वारन्टाईन करणही महत्वाचं असल्याची टोपे यांनी सांगितलं.

13 देशांसाठी कडक निर्बंध

जगातील अनेक देशांनी नवा व्हेरिएंट सापडलेल्या राष्ट्रांमधून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. नुकतेच ब्रिटननेही ७ राष्ट्रांवर बंदी घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना उड्डाणांसंदर्भात कडक नियमन करण्यासाठी पत्रही लिहिलं आहे. आता महाराष्ट्रात कशा पद्धतीने क्वारन्टाईनचे निर्णय होणार याकडे, सर्वांचं लक्ष्य लागलंय. प्राथमिक माहितीत सुरुवातील 13 देशांमधून येणाऱ्या लोकांना कडक क्वारन्टाईनमध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जाणार असून 8 दिवसानंतर दुसऱ्यांदा ही चाचणी घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT