कर्जमुक्ती मिळणार 
मुंबई

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार 

सकाळ वृत्तसेवा

अलिबागः नैसर्गिक आपत्तीमध्ये भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी निगडित कर्जाची मुदतीत परतफेड करता आली नाही. शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.


शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या कर्जखात्याशी आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बॅंका, व्यापारी बॅंका, ग्रामीण बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले तसेच राष्ट्रीयीकृत बॅंका व व्यापारी बॅंकांनी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित, फेर पुनर्गठित कर्ज विचारात घेण्यात येणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT