Rain Update Esakal
मुंबई

Rain Update: पुन्हा पावसाला सुरूवात; मुंबईसह राज्यासह या भागात 'रेड अलर्ट', हवामान विभागाने दिला सर्तकतेचा इशारा

Maharashtra Rain Update: राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचं चित्र आहे. तर पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचं चित्र आहे. तर पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाने पुढच्या काही तासांसाठी मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने नागरिकांना आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे, त्याचबरोबर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यकता भासल्यास मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासंबधी मुंबई महानगरपालिकेने आपल्या सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

हवामान विभागाने पुढील 3 तासांमध्ये मुंबई, पुणे, सातारा आणि रेड अलर्ट दिला आहे. पुण्यासह रायगड, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोकल रेल्वे गाड्यांवर देखील पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं त्याचबरोबर काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर 'सतर्क'ने दिलेल्या माहितीनुसार 'गेल्या ७२ तासांत दरड प्रवण क्षेत्रांत झालेला पाऊस लक्षात घेता कोकण आणि घाट क्षेत्रांत पुढील ४८ तासांत दरडींची 'सर्वसाधारण' शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास शक्यता आणखी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 'सतर्क'ने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर ज्या भागात दरडी कोसळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी काळजी घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास त्या ठिकाणी प्रवास करणे टाळावे असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रत्नागिरी तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT