rajan vichare criticize rebel mla shiv sena politician thane Sakal
मुंबई

Thane News : सच्चे शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांना जनताच धडा शिकवणार - राजन विचारे

आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्याचे दैवत होते, आज त्यांच्या नावावर निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यांच्या घरांवर नांगर फिरविला जात आहे. त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : आनंद दिघे हे ठाणे जिल्ह्याचे दैवत होते, आज त्यांच्या नावावर निष्ठावान शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले जात असून त्यांच्या घरांवर नांगर फिरविला जात आहे. त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे.

त्यामुळे स्वत:ला सच्चे शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्यांना आता जनताच धडा शिकविले अशी टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त समाधिस्थळी जावून अभिवंद केले. त्यावेळी त्यांनी प्रत्र्कारांशी बोलतांना हि टीका केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी शनिवारी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधिस अभिवादन केले. तसेच टेंभी नाका येथील दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे, दिघे साहेब अमर रहे या अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

यावेळी ठाकरे गटाने टेंभी नाका आणि शक्तीस्थळावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, आदींसह इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

दरम्यान, पत्रकारांशी बोलतांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे खरे शिवसैनिक कोण हे आता आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. आगामी काळात दिघे हेच या गद्दारांना जागा दाखवतील अशी टिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT