मुंबई

"मला झालेल्या कोरोना संसर्गाने माझं कुटुंब पळून गेलं..."; कस्तुरबातील महिला कर्मचाऱ्याची Inside Story

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी आम्ही स्वतःला झोकून दिले. त्यातूनच मला ही कोरोना ची बाधा झाली. माझा संसर्ग माझ्या कुटुंबाला होऊ नये त्यासाठी मी त्यांना गावी जाऊन राहण्यास सांगितले. मात्र काहींनी कोरोनामुळे माझे कुटुंबीय पळून गेल्याची आवई उठवली, त्याचे वाईट वाटले अशी भावना कोरोनामुक्त झालेल्या कस्तुरबातील आयाबाईने व्यक्त केल्या.

कस्तुरबा रुग्णालयातील एक आयाबाई आणि महिला सफाई कामगाराला रूग्णालयातच कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर रूग्णालयातच यशस्वी उपचार झाल्यानंतर त्या दोघी ही कोरोनामुक्त झाल्या. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्या आपल्या टिटवाळा येथील राहत्या घरी पोहोचल्या असता तिथल्या रहिवाशीयांनी त्यांचे टाळ्या वाजवून आणि त्यांच्या फुले उधळून त्यांचे स्वागत केले.

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या सेवेसाठी जुंपलो.  सेवा करत असताना आम्ही कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क येत होतो. अशा परिस्थिती हा संसर्ग घरापर्यंत पोहोचायला नको यासाठी मी घरी न जाता रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतला. पुढील चार दिवसातच मला ही कोरोनाची बाधा झाली. माझ्यावर कस्तुरबा रूग्णालयामध्येच उपचार सुरू झाले. माझ्या मुलाच्या काळजीपोटी मी त्याला व माझ्या पतीला गावी जाऊन राहण्यास सांगितले. त्यानुसार ते दोघे गावाला निघून गेले. मात्र त्यानंतर मला कोरोना संसर्ग झाल्याने माझे कुटुंबीय पळून गेल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली. याचा मला फारच मनस्ताप सहन करावा लागण्याचे कोरोनामुक्त झालेल्या या महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केल्या. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणावर ही बहिष्कार टाकू नये अश्या अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केल्या.

आम्ही तब्बल 21 दिवस कस्तुरबा रुग्णालयात दाखल होते. आम्ही या आजारातून बरे होणार याचा विश्वास होता. मात्र लोकांनी ही या आजाराला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरकारने घालून दिलेले निर्देश पाळणे महत्वाचे आहे. हा संसर्ग पसरू नये त्यासाठी आपण घरातच राहणे महत्त्वाचे आहे. आपण जर घरात राहिलो तर हा संसर्ग नक्कीच आटोक्यात येईल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Purchase Limit India : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! डिझेल विक्रीवर मर्यादा; एका व्यक्तीला मिळणार फक्त 'इतके' डिझेल

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Interview : "हा निव्वळ योगायोग" गव्हर्नर सिनेमावर दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर व्यक्त; "मनोज बाजपेयींमुळे ही संधी मिळाली "

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

Tilari Forest women killing Case : घटस्फोटीत महिलेसोबत संबंध, लग्नाचं अमिष दाखवून तिलारी जंगलात नेत केला खून; पितापुत्राचा रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT