मुंबई

मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांवर विक्रमी कारवाई, 48 लाखांचा दंड वसूल

समीर सुर्वे

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांकडून महानगर पालिकेने सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 24 हजार 226 जणांकडून 48 लाख 45 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी 8 हजार 674 जणांवर कारवाई केली आहे.

एप्रिल महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले. आता पर्यंत 19 लाख 66 हजार जणांकडून 39 कोटी 69 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. फेब्रुवारीपासून महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी या कारवाईचे अधिकार पोलिसांनाही दिले. तसेच रेल्वे स्थानकांवरही क्‍लिनअप मार्शल तैनात करण्यात आले आहे. मंगळवारी मुंबईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात पालिकेला यश आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी पालिकेच्या पथकांनी मंगळवारी 14 हजार 922 जणांवर कारवाई करत 29 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वे स्थानकांच्या परिसरात 630 जणांवर कारवाई करुन 1 लाख 26 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी 8 हजार 674 जणांवर कारवाई करुन 1 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती महानगर पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
सर्वात कमी कारवाई

गोवंडी शिवाजी नगर एम पूर्व प्रभागाच्या हद्दीत मंगळवारी 186 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही सर्वात लहान संख्या असून या प्रभागातून 37 हजार 200 रुपयांचा दंड जमा झाला आहे. त्यानंतर ई भायखळा माझगाव प्रभागात 230 जणांवर कारवाई करुन 46 हजार रुपयांचा दंड जमा झाला आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Record action against no wearing masks  Mumbai fine 48 lakh from 24 thousand people

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात खळबळ ! नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने संपवले जीवन, राहत्या घरी घेतला गळफास; धक्कादायक कारण समोर

'मी त्याला जोरात ढकललं, आणि...' श्रुती मराठेनं सांगितला 'राधा ही बावरी'च्या सेटवरील सौरभसोबत किस्सा, म्हणाली...

All England Open: आता 'लक्ष्य' ऐतिहासिक विजेतेपद! Lakshya Sen ने अंतिम फेरी गाठून घडवलाय इतिहास

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी DA बाबत मोठी अपडेट, तुमच्या महागाई भत्त्यात होणार 'इतकी' वाढ

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सरोजिनी नगरमध्ये साधला महिलांशी संवाद

SCROLL FOR NEXT