Real-Estate-Regulation-Act-.jpg 
मुंबई

पुनर्विकास करणाऱ्या रहिवाशांना रेराचे कवच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात पुनर्विकासासाठी जाऊ इच्छिणाऱ्या इमारतींमधील जुन्या ग्राहकांनादेखील रेरा चे कवच मिळेल, असे महत्वपूर्ण आश्वासन केंद्रीय गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रेराच्या अंमलबजावणी बाबत रविवारी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीत ही हमी दिली.

महाराष्ट्रात पुनर्विकास करणाऱ्या इमारतींमधील जुन्या ग्राहकांना रेराचे संरक्षण मिळत नसल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी यावेळी दाखवून दिले. यावर श्रीमती सीतारामन यांनी आश्चर्य व्यक्त करून पुरी यांच्याकडे विचारणा केली. त्यामुळे आपण याबाबत महारेरा अध्यक्षांशी बोलून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन पुरी यांनी दिले. 

पुनर्विकासातील जुन्या ग्राहकांवर अन्याय होऊ नये तसेच बिल्डरकडून त्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून त्यांनादेखील रेरा चे संरक्षण मिळणे जरुरी आहे, असे देशपांडे यांनी यावेळी दाखवून दिले. चार राज्यांतील रेराचे अध्यक्ष, विकासकांचे आणि निवडक ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते. 

पैसे उकळणाऱ्या बिल्डरना
महारेरात नोंदणी आवश्यक 

राज्यातील अनेक बिल्डरांनी बांधकाम परवाने नसतानाही ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेऊन बांधकाम केले नाही. असे ग्राहक महारेराकडे दाद मागू शकत नाहीत, कारण अशा प्रकल्पांची महारेरात नोंदणीच होत नाही. त्यामुळे ग्राहकांवर दुहेरी अन्याय होतो, असेही ग्राहक पंचायतीने यावेळी दाखवून दिले. बांधकाम परवानगी नसल्यास कायद्यानुसार प्रकल्प नोंदणी करू शकत नाही, अशी महारेराची भूमिका आहे.

असे असल्यास ग्राहकांवरील अन्याय टाळण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली. अन्य राज्यांच्या रेरा अध्यक्षांनीदेखील या मागणीला पाठिंबा दिला. त्यावर गृहनिर्माण मंत्र्यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि महारेरा अध्यक्षांना येत्या पंधरा दिवसांत याबाबत सुयोग्य निर्देश देऊ असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Hasan Mushrif : गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे पिछाडीवर; सतेज पाटलांचे सहा शिलेदार आघाडीवर; आघाडीवर, पिछाडीवर असणाऱ्या उमेदवारांची वाचा यादी

असे हल्ले खपवून घेणार नाही, हल्लेखोर डरपोक... राज्य आणि देशाबाहेरून गँग चालवतात : मुख्यमंत्री फडणवीस

Mangaon Crime News : माणगावात आरती करून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने खून; मुख्य आरोपी 48 तासांत गजाआड; कर्नाटक सीमेवर अटक

Dussehra 2026: दसऱ्याला शस्त्र पूजेसाठी ४५ मिनिटांचा खास शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा करण्याची सोपी पद्धत!

Latest Marathi News Live Update : गोकुळ निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष! 'क्रॉस व्होटिंग'मुळे निकालाची उत्कंठा शिगेला, अवघ्या १०० ते ३०० मतांच्या फरकाने उमेदवारांच्या विजयाची शक्यता

SCROLL FOR NEXT