Iqbal Singh Chahal sakal
मुंबई

Mumbai : कर्मचाऱ्यांच्या दोन डोस ची अट शिथील

राज्य सरकारने 11 ऑगस्ट रोजी कोविड निर्बंध शिथील करुन दुकाने, उपहारगृह रात्री पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली.

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुकाने, मॉल, स्पा, जिम मध्ये काम करणार्या कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस घेण्याची अट शिथील होणार आहे. तसेच,18 वर्षाखालील व्यक्ती आणि बालकानांही मॉल मध्ये जाता येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडून (maharashtra government) सुचना जाहीर होण्याचे संकेत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिले.

राज्य सरकारने 11 ऑगस्ट रोजी कोविड निर्बंध शिथील करुन दुकाने, उपहारगृह रात्री पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली. त्याच बरोबर मॉल, स्पा, जिमही सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या ठिकाणी काम करणार्या कर्मचाऱ्यांनी कोविड लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक होते. अशाच कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी होती. या अटीमुळे व्यवसाय सुरु करणेच शक्य नसल्याची तक्रार व्यापारी करत होते.

याबाबत आज माध्यमांशी बोलताना आयुक्त चहल म्हणाले, " कर्मचाऱ्यांनी किमान एक डोस घेणे बंधनकारक आहे. तशी परवानगी त्यांना देण्यात येईल. याबाबत राज्यसरकार कडून निर्णय घेतला जाईल. मात्र,एकही डोस न झालेल्या व्यक्तीला अशा ठिकाणी काम करण्याची परवानगी मिळणार नाही. असेही आयुक्तांनी सांगितले. लसीच्या दोन डोस मधिल अंतराचा विचार करुन हा निर्णय घेण्यात येईल. 18 वर्षा खालील व्यक्तींचे लसिकरण अद्याप सुरु झालेले नाही. त्यामुळे त्यांनाही मॉल मध्ये प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी म्हंटल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

रणवीर सिंह आता बॉलिवूडमध्ये काम करु शकणार नाही? ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंह अडचणीत, FWICE ची मोठी कारवाई

Kolhapur कार-कंटेनरची धडक, २८ वर्षीय डॉक्टरचा जागीच मृत्यू; हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशीच काळाचा घाला

SCROLL FOR NEXT