मुंबई

शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवा! 'ट्विटर'वर पालकांचे मतदान सुरू

तेजस वाघमारे

मुंबई : विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर शिक्षणमंत्री आपल्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने राज्यभरातील पालक त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करू लागले आहेत. ट्विटरवरून पालकांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पदावरून हटवण्यासाठी मतदान सुरू केले आहे. मतदानाला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शाळांनी पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेतले. ते भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला. त्याबाबत पालकांनी शिक्षण मंत्र्यांकडे आणि शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या; परंतु त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप पालकांनी केला. त्यामुळे पालकांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे आपली गाऱ्हाणी मांडली. राज्यमंत्र्यांनी शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिले; परंतु त्याला शिक्षण विभागाने स्थगिती दिली, असा आरोप होऊ लागला आहे. 

ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने पालकांकडून शालेय शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. त्याबाबतही शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. 

रिट्विटचे प्रमाण मोठे 
शिक्षणमंत्री केवळ आश्‍वासनेच देत असल्याने पालकांनी त्यांना पदावरून हटविण्यासाठी ट्विटरवर मोहीम उघडली आहे. मोहिमेला पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षण मंत्र्यांविरोधातील संताप व्यक्त आहे. एमआयटी पुणे पालकांनी केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात रिट्विट होत आहे. 

Remove Education Minister Parents start voting on Twitter
-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

SCROLL FOR NEXT