File Photo Aurangabad
मुंबई

Auto-Taxi News: आता भाडं नाकारल्यास रद्द होणार रिक्षा-टॅक्सीचं लायसन्स; पोलिसांनी दिले नवे आदेश!

भाडं नाकारणं हा जणू काही रिक्षा चालकांचा अधिकारच बनला आहे, त्यावरच आता चाप येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाडं नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला तुम्हीही कधीतरी समोरं गेले असाल. पण आता त्यांची ही मुजोरी चालणार नाही. कारण भाडं नकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं थेट लायसन्सच रद्द करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. यासाठी मुंबई पोलिसांकडून पुढच्या आठवड्यात खास सप्ताह अभियान सुरु करणार आहेत. (rickshaw taxi driver licence will be cancelled if he refuses fare Mumbai Police gives new orders)

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ यांच्या माहितीनुसार, मुंबईत रेल्वे स्टेशन्सच्या आजूबाजूला बेकायदा पद्धतीनं गाड्या पार्क करणारे, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबतचं सविस्तर निवेदन आरटीओला पाठवण्यात आलं आहे.

४० हजारांहून अधिक पावत्या फाडल्या

मोटर वाहन अधनियमाच्या कलम १७९ अंतर्गत निश्चित संख्येपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाण्याच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांपैकी बहुतेक वाहन चालक हे वांद्रे पूर्व-पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, सांताक्रूझ, कांदिवली पूर्व आणि मानखुर्द या भागातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT