मुंबई

सदाभाऊ खोत यांनी घेतली कोशारींची भेट; राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावे सूचवली

तुषार सोनवणे

मुंबई - एनडीएचे घटक पक्ष असलेले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. खोत यांनी राज्यपाल नियुक्त 12 विधीमंडळ सदस्यांची नावे राज्यपालांना दिली आहेत. 

राज्यात महाविकास आघाडी सरकारने राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी 12 उमेदवारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यपालांना कितीवेळात त्यावर निर्णय घ्यावा याचे बंधन नाही. आता रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनीच राज्यपालांना 12 नावे सुचवली आहेत. ही नावे कला, क्रीडा, सामाजिक, साहित्य इत्यादी क्षेत्रातील आहेत. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. 

एकीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नावांवर राज्यपालांनी निर्णय घेतला नसून दूसरीकडे एनडीएचा घटकपक्ष असलेल्या रयत क्रांतीने राज्यपालांना नावे सूचवल्याने सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुढेंच्या कारवाईनंतर सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये... खोकल्याच्या सिरपबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!

एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितलं Body Stifness आणि वेदनांचं खरं कारण

CA जॉबचं आमिष, बार गर्लला लग्नाचं स्वप्न, बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीचे संबंध... मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याचा काळा चेहरा उघड

Pandharpur Murder Case: पंढरपुरात खळबळ! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर घराच्या दरवाराजा अडकवला पाय..

IND A vs SL A: '...त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले', सुपर ओव्हरमधील श्रीलंकेच्या 'माइंड गेम'वर अश्विन थेटच बोलला

SCROLL FOR NEXT