'मुळशी पॅटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत...  
मुंबई

'मुळशी पॅटर्न'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'मुळशी पॅटर्न' या प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपटाने विक्रमी कमाई केली. या चित्रपटाची कथा, संवाद, स्टारकास्ट सारे काही भारीच होते. या चित्रपटाची लोकप्रियता बॉलीवूडपर्यंत पोहचली अन्‌ मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता तर या चित्रपटाचे हिंदीमधील नावदेखील ठरले आहे. 

मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापलीकडे आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकारांनाही मराठी चित्रपटांची भुरळ पडली आहे. तसेच हिंदीमधील बरेच चेहरे मराठी चित्रपट करू इच्छित आहेत. तगड्या कथा आणि विषयच मराठी चित्रपटांचे खरे यश आहे. मराठीत नवनवीन विषय मांडले जात आहेत आणि हे चित्रपट पाहण्यास प्रेक्षकही चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. असाच एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित झाला तो चित्रपट म्हणजे मुळशी पॅटर्न. याच मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक लवकरच तयार होणार असून, त्याचे नाव धाक असणार आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमयेने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. आता हिंदीमध्ये सलमान ती भूमिका साकारतोय. प्रवीण तरडेने अभिनयात आपला चांगलाच जम बसवला. त्याचबरोबरीने दिग्दर्शन क्षेत्रातही तो तितकाच यशस्वी ठरला. मुळशी पॅटर्नने त्याला एक वेगळीच ओळख दिली. मुळशी या गावावर आधारित या चित्रपटात या गावातील शेतकरी बांधव, पोलिस अधिकारी आणि या गावाचा इतिहास दाखवण्यात आला. आता हिंदीमध्ये मुळशी पॅटर्न पाहणे रंजक ठरणार आहे. 

ही बातमी वाचली का? मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल झाली, अन् यंत्रणा हलली!

अधिकृत हक्क खरेदी 
मुळशी पॅटर्नपासून चक्क बॉलीवूडचा दबंग सलमान खान प्रभावित झाला आहे. त्यानेच या चित्रपटाच्या नावाचे अधिकृत हक्क खरेदी केले आहेत. सलमान या चित्रपटात पोलिस इन्स्पेक्‍टरची भूमिका साकारणार आहे. तसेच सलमानच्या बहिणीचा पती आयुष शर्मा या चित्रपटात एका गॅंगस्टरची भूमिका साकारणार आहे. म्हणजे सलमान-आयुषची एक वेगळीच जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळेल. सलमाननेच आयुषला बॉलीवूडमध्ये लॉंच केले. तसेच आयुषही पहिल्यांदाच एका गॅंगस्टरची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. सलमानला मुळशी पॅटर्न चित्रपटाची कथा फारच आवडली. त्यामुळे हा चित्रपट करण्याचा निर्णय त्याने घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT