Salman Khan  sakal media
मुंबई

'KRK' च्या याचिकेवर सलमान खानने खुलासा करावा - उच्च न्यायालय

सुनिता महामुनकर

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) विरोधात सोशल मीडियावर (social media) पोस्ट करण्यासाठी मनाई करण्यात आलेल्या दिग्दर्शक कमाल खानने (kamaal khan) आता मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) याचिका (petition) दाखल केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने सलमानला दिले आहेत.

सलमानच्या राधे सिनेमासह सलमानच्या व्यक्तिगत आयुष्य, व्यावसायिक घडामोडी आणि अन्य सर्वच बाबतीत कमाल खानने अनेकदा वादग्रस्त पोस्ट समाज माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे सलमानने शहर दिवाणी न्यायालयात याविरोधात याचिका करुन कमाल खानला त्याच्या बद्दल पोस्ट लिहिण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे. दिवाणी न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे आणि मनाई आदेश जारी केला आहे.

याविरोधात कमाल ने याचिका केली आहे. सिनेकलावंताविरोधात आणि त्यांच्या सिनेमांवर समिक्षक टीकात्मक लिहू शकत नाही का, सलमानला टीकांची एवढा आक्षेप का आहे, असे प्रश्न याचिकेत उपस्थित केले आहेत. कनिष्ठ न्यायालय सरसकट मनाई करु शकत नाही, त्यामुळे हा मनाई आदेश रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे. न्या अजय गडकरी यांच्यापुढे आज यावर सुनावणी झाली. न्यायालयाने यावर सलमान ला नोटीस बजावली असून बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT