मुंबई

एकाच दिवशी उपनगरातून तीन अजगर, सरडा, घोरपडाची सुटका; उपचारानंतर जंगलात सोडणार

मुकेश धावडे


वडाळा : मुंबई उपनगरातील भांडुप आणि मुलुंड येथून दोन  श्यामेलिऑन (रंग बदलणारा सरडा) तर, मिररोड व बोरीवलीतून घोरपड आणि तीन अजगर यांची बुधवारी (ता. 26) सुटका करण्यात आली. एसीएफ फाऊंडेशन आणि प्लांट एण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटीच्या स्वयंसेवकांनी याबाबत वनविभागाला माहिती देत या प्राण्यांना ठाण्यातील जंगलात सोडल्याची माहिती  वन्यजीव रक्षक आणि एसीएफ पॉज-मुंबईचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी दिली.

मुलुंड येथे राहणारे पवन शुक्ला यांच्या घराच्या बाजूला रंग बदलणारा सरडा दिसून आला होता. तर, भांडुप येथील रहिवाशी रुपेश मिश्रा यांच्या घराच्या बाजूला झाडावर सरडा आढळला. त्याला काही कावळे टोचत होते. त्याची माहिती मिळताच निशा कुंजू आणि हितेश यादव या स्वयंसेवकांनी त्याठिकाणी पोहोचून दोन्ही सरड्यांची सुटका केली. तसेच बोरिवली येथून किरण लाड यांच्या घरातून घोरपड आणि मिररोड येथील मनीषा सावंत यांच्या घराच्या आवारातून तीन अजगरांची स्वयंसेवकांनी सुटका केली.

एसीएफ पॉज-मुंबईचे स्वयंसेवक सिद्धेश ठावरे आणि अभिजीत सावंत यांनी या सर्व वन्यजीवांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. मनीष पिंगळे आणि डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे नेले. यापैकी एका जखमी अजगराला पंधरा दिवसाच्या वैद्यकीय उपचारानंतर ठाण्यातील जंगलात सोडणार अल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस?

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

TMC कुणाची? बंडखोर पक्षाच्या नावासह चिन्हावर दावा करणार; शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर ममतांचा पक्ष

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत अधिकाऱ्यासमोर शिवसैनिकांनी निमंत्रण पत्रिका फाडली

IND A vs SL A: दुष्काळात तेरावा महिना! विपराज निगमच्या चुकीचा फटका; भारताच्या धावा ICCने कमी केल्या, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT