sanjay raut Esakal
मुंबई

Datta Dalvi Arrest: आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द कसा आला, सेन्सॉर बोर्डानं का नाही घेतला आक्षेप? दळवींना समर्थन देत राऊत कडाडले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर भांडूप पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी दळवी यांना समर्थन देत काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. दत्ता दळवींनी वापरलेला तो शब्द धर्मवीर चित्रपटात वापरलेला आहे. धर्मवीर चित्रपटात वापरण्यात आलेला शब्द सेन्सॉर बोर्डाने काढलेला नाही. तो शब्द चुकीचा असेल तर चित्रपट निर्मात्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली. त्याचबरोबर आम्ही सगळे दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत, असेही राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांनी दळवींनी उच्चारलेले शब्द पुन्हा एकदा उच्चारले आहेत. त्याचबरोबर धर्मवीर चित्रपटात ही शिवी वापरली जाऊ शकते. तर मग दळवींच्या विधानावर आक्षेप का? शिंदे गट हे मुद्दाम करत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काय आहे प्रकरण?

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT