MP Sanjay Raut sakal media
मुंबई

पवार सेनेचे नेते नाहीत, गितेंच्या वक्तव्यावर राऊत म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी केलं.

मुंबई - शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी केलं. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. तसंच मला हा विषय माहिती नाही. पवार साहेब आणि ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याचा सरकारचा काहीही संबंध नाही. हे सरकार उद्धव ठाकरे चालवत आहेत. त्यांचे नेतृत्व सर्वांनी स्वीकारले असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत असेही म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. राज्यातील व्यवस्था ही तीन पक्षांची आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. राज्याचं सरकार पाच वर्षे चालेल आणि या सरकारला महाराष्ट्राची मान्यता आहे.

शरद पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊ शकत नाही. ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी तटकरेंच्या घरी जाणार आहात का. आपल्याच घरी, शिवसेनेच्या घरी येणार आहात असं गिते रायगडमधील एका कार्यक्रमावेळी म्हणाले होतेआघाडीचे नेते आघाडी सांभाळतील, आपण ग्रामंपचायत, जिल्हा परिषद सांभाळायची आहे. राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. पवार आमचे गुरु होऊ शकत नाहीत. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच असल्याचंही गितेंनी म्हटलं.

मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं म्हणायचं कारण मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल आणि सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी ही गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळाताना आघाडीचा विचार करायचा नाही. फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. दोन्ही काँग्रेसने कधी एकमेकांचे तोंड बघितले नव्हते. त्यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एकमत नव्हतं आणि दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाहीत, तर शिवसेना-काँग्रेससुद्धा एक विचाराची कदापी होऊ शकणार नाही असेही गिते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT