Sanjay Raut on BJP e sakal
मुंबई

त्यांचा माज वाढलाय, मोदींनीच याचं उत्तर द्यावं, राऊत भडकले

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता वाढली आहे. सेनेच्या वतीने सर्व आमदारांना मुंबईत येण्यासाठी आणि चर्चेचे दरवाजे खुले असल्याची बोळवण होत आहे. मात्र, शिंदे अद्याप बंडावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणण्यात आलाय. मात्र, आमदार पुन्हा पक्षात येतील असा त्यांना विश्वास आहे. (Maharashtra Politics)

ज्या दिवशी हे आमदार मुंबईत येतील , त्याच दिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळा साहेबांवरील भक्तीची आणि शिवसेनेवरील श्रद्धेची खरी कसोटी लागेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभागृहात हा विषय येईल, तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, असं राऊत यांनी म्हटलंय. (Sanjay Raut :Latest News)

नारायण राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या ट्विटचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. पवारांना धमक्या देण्यापर्यंत त्यांना माज चढला आहे, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut slams Narayan Rane)

यापुढे लढाई कायदेशीर होणार असल्याच राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्यासोबत कितीही आमदार असतील. ते काहीही दावे करत असतील. पण मुंबईत आल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. ठिके! शिवसेनेचा आकडा कमी झालेला आहे. पण आमदार मुंबईत येतील त्यावेळी त्यांच्या बाळासाहेबांवरील निष्ठेंची आणि सरकारवरील श्रद्धेची कसोटी लागणार आहे, असं राऊत म्हणाले.

शरद पवार महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. आम्हाला धमक्या द्या. आम्ही बघून घेऊ. पण पवार साहेबांना धमक्या देण्याएवढा त्यांचा माज वाढला आहे. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, हे मोदी आणि शाहांनी स्पष्ट करावं. आम्हीही तसंच प्रत्युत्तर देऊ, असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना महासागर आहे. तो उसळलेला असतो. ही लाट येऊल आणि जाईल, त्यामुळे आमदारही पुन्हा शिवसेनेत येतील. संख्याबळ कागदावर जास्त असू शकतं. आमच्या १२ आमदारांनी गद्दारीची भाषा केली आहे. त्यामुळे मुंबईत येऊन संख्याबळ सिद्ध करता येईल, ते व्हा बघू, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT