Crime sakal
मुंबई

Crime News : धक्कादायक! शाळकरी मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या

शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

मुरबाड - शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटूंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी राहणाऱ्या ३७ वर्षीय आरोपीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खळबळजनक बाब म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल होताच त्यानेही मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन करीत आत्महत्या केली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या ३७ वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित शाळकरी मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात कुटूंबासह राहून गावातील शाळेतच दहावी वर्गात शिक्षण घेत आहे. तर ३७ वर्षीय आरोपीचा विवाह झाला असून, पत्नी त्याला सोडून गेली असून तो पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. त्यातच जानेवारी २०२४ मध्ये मृत आरोपीची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या शाळकरी पीडित मुलीवर पडली होती.

त्यातच आरोपीने पीडित मुलीच्या घराच्या मागे असलेल्या बाथरूममध्ये ती आंघोळ करतानाचे फोटो त्याने आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केले. त्यानंतर तेच फोटो पीडित मुलीला दाखवून तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी तसेच कुटूंबालाही मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बाथरूममध्येच १८ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यत वारंवार बलात्कार करत होता.

आरोपीच्या वाढत्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास असहाय्य होत असल्याने ती भयभीत होऊन शाळा आणि घरातही वावर होती. त्यामुळे पिडतेच्या आईने तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, तिच्यावर घडत असलेला धक्कादायक प्रकार तिने आईला सांगीतला आणि नंतर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शाळकरी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ३७ वर्षीय शेजारी राहणाऱ्या आरोपीवर भादंवि कलम ३७६,(२)(एन ), ३७६ (३), ३५४(ए ) ३५४,( सी ) , ३४१, ५०४, ५०६, सह पोक्सो कलम ४, ६, ८, १२ नुसार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तपास अधीकारी बाबर यांनी दिली आहे.

शिवाय गुन्हा दाखल होताच आरोपीने दुसऱ्या गावात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा आणखी एक विश्वविक्रम, १९८९ पासून सचिन तेंडुलकरच्या नावावर होता हा विक्रम...

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दहा वर्षे नोकरी केल्यानंतर किती पेन्शन मिळेल? नवीन EPS योजना काय आहे?

Latest Marathi Update : राहुल गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसेस गांधी स्मृती येथे पोहोचल्या

Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

IND U-19 vs SL U-19 : भारताचा श्रीलंकेवर 211 धावांनी दणदणीत विजय; युवा कसोटी मालिका 1-0 ने खिशात

SCROLL FOR NEXT