sndt university student sakal
मुंबई

Mumbai News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे बौद्ध‍िक संपदेचे कार्यक्षेत्र अमर्याद असेल

देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असून या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर बौद्धिक संपदेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात अधोरेखित होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू असून या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर बौद्धिक संपदेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात अधोरेखित होणार आहे. यामुळे देशात बौद्धिक संपदेच्या विविध विषयाला शिक्षक विद्यार्थी संशोधकांमध्ये मोठी चालना मिळणार असून, यामुळे आपला भारत देश हा संशोधनाच्या आणि बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात एक नवीन शिखर पार करेल असा विश्वास डेक्स लेजिसचे व्यवस्थापकीय संचालक व एआय विषयातील जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ तज्ञ ऍड. दिव्येंदू वर्मा यांनी व्यक्त केले.

एसएनडीटी विद्यापीठ आणि अमेरिकन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन (एआयपीएलए), तसेच डेक्स लेजीज च्या संयुक्त विद्यमाने आज एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू संकुलातील उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे 'भारतात उद्योजकतेचा प्रसारः बौध्दिक संपदेच्या माध्यमातून एक प्रवास' या विषयावर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ऍड. वर्मा बोलत होते.

यावेळी उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका डॉ. नेमा शिखा, प्रा. नेहा आठवले-म्हाळगी, प्रा. मनोज घाग, प्रा. प्रतिभा महाकाळ यांच्यासह डेक्स लेजीजच्या ॲड. स्फूर्ती दलोद्रिया आणि प्रीती मोरे आदी उपस्थित होते.

ऍड. वर्मा म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बौद्धिक संपदा तसेच पेटंट या विषयाला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे त्यामुळे येत्या काळात विद्यार्थी शिक्षक यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन पेटंट तसेच ट्रेडमार्क अधिक क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. महिला आणि विद्यार्थिनींमध्ये संशोधक होण्याची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला मिळाली आहे.

आज एसएनडीटी विद्यापीठाने महिलांच्या शिक्षणाची प्रचंड मोठी परंपरा देशात सुरू ठेवली असून या परंपरेचे वारसदार येत्या काळात देशातच नव्हे तर जगभरामध्ये बौद्धिक संपदा पेटंट अधिक क्षेत्रात कार्य करतील, यासाठी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी तयार राहावे आणि या विषयातील अधिक माहिती जाणून घ्यावी असे आवाहन  ऍड. वर्मा यांनी केले.

जगभरातील विविध देशात कार्यरत असलेल्या एआयपीएलए या  सोसाइटीच्या कार्याची यावेळी ऍड. वर्मा यांनी माहिती दिली. तर स्फूर्ती दालोद्रिया यांनी एंटरप्रेनरशिप काय असते तसेच बौद्ध‍िक संपदा आणि उद्योजकता हे एकमेकांशी कसे  संबंधित आहेत, यावर प्रकाश टाकला.

तर प्रीती मोरे स्टार्ट अपसाठी असलेले फायदे आणि सरकारी योजना या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी बौद्ध‍िक संपदा आणि उद्योजक आदी विषयांवर अनेक प्रश्न उपस्थित करून त्यासंदर्भात तज्ञाकडून माहिती जाणून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT