attempt to murder  sakal media
मुंबई

कंत्राट मिळविण्याच्या वादातून सीवूड्समध्ये तरुणावर हल्ला; गुन्हा दाखल

पाच पसार हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सीवूड्स रेल्वेस्थानक (Seawood railway station) परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी साहित्य पुरविण्याचे कंत्राट (contract) मिळविण्याच्या वादातून पाच हल्लेखोरांनी ब्रिजेश पाटील (brijesh patil) याच्यावर भररस्त्यात धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला (attack) करून पलायन केल्याची घटना शनिवारी रात्री सीवूड्स येथील ग्रँड सेंट्रल मॉलसमोर (Grand central mall) घडली.

या हल्ल्यात ब्रिजेश पाटील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी हल्लेखोर मिलिंद भोईर याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील जखमी ब्रिजेश पाटील व त्याच्यावर हल्ला करणारे आरोपी मिलिंद भोईर, मनोहर नाईक व इतर हे सर्व नेरूळच्या करावे गावात राहतात.

सर्वजण माथाडी टोळीशी संबंधित असून, त्यांनी सीवूड्स येथील ग्रॅँड सेंट्रल मॉलमधील विविध प्रकारच्या कामाची कंत्राटे मिळविली आहेत. मॉलमधील काम मिळवण्यावरून या टोळ्यांमध्ये पूर्वीपासून वाद असून, त्यांच्यामध्ये यापूर्वीही भांडण झाले आहे. सध्या सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात एल अँड टी कंपनीमार्फत इमारत व इतर बांधकामाची कामे सुरू असून, या ठिकाणी बांधकाम साहित्य पुरविण्याचे कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात आरोपी मिलिंद भोईर होता; मात्र हे कंत्राट ब्रिजेश पाटील याने मिळविल्याने मिलिंद भोईर व त्याच्यामध्ये वाद सुरू होता.

ब्रिजेश पाटील याने कंत्राट घेऊ नये, यासाठी मिलिंद भोईर व त्याचे साथीदार त्याच्यावर दबाव आणत होते; मात्र ब्रिजेश पाटील त्यांचे काहीक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या मिलिंद भोईर व त्याच्या साथीदारांनी शनिवारी रात्री ब्रिजेश पाटील याला सीवूड्स येथील ग्रँड सेंट्रल मॉलसमोर भररस्त्यात गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

Truck Accident : धारूर घाटात सरकी वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक दरीत कोसळला, प्रवासी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

Sugar Rate : साखरेच्या दराची कृत्रिम सूज ओसरली! 1500 रुपये प्रतीक्विंटलची घट; साखरेला स्थर्य मिळण्याची शक्यता

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

SCROLL FOR NEXT