Corona Fight sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनोचा विळखा सैल, फक्त 557 गंभीर रुग्ण, जाणून घ्या सविस्तर

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) आता कोरोना (Corona) हळूहळू नियंत्रणात येत आहे. याचा अंदाज रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवरुन लावला जाऊ शकतो. कोरोनामधील सक्रिय रूग्णांपैकी (Corona Active Patients) केवळ 10 टक्के म्हणजेच 557 रुग्ण गंभीर आहेत, ज्यांच्यावर पालिका रुग्णालयात (BMC Hospital) उपचार सुरू आहेत. तर, कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आतापर्यंत 7 लाख मुंबईकरांनी कोरोनाला हरवले (Corona free patient) आहे.  ( Seven lac Mumbaikars corona free only 557 serious patients - nss91)

कोरोनाची दुसरी लाट देखील नियंत्रणात आली आहे. मुंबईत दररोज कोरोनाचे 350 ते 450 दरम्यान नवीन रुग्ण आढळतात. यासह, कोरोनामधून दररोज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 च्या आत आली आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोना रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि कोरोनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढल्यामुळे कोरोना मुंबईत नियंत्रणात आला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 5799 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सुमारे 2457 रुग्ण लक्षणे नसलेले आहेत आणि 2765 रूग्णांमध्ये जरी कोरोनाची लक्षणे असतील तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय मुंबईत केवळ 557 रुग्ण गंभीर आहेत.

पालिका कुठेही कमी पडणार नाही, असे सांगत अजूनही चाचण्यांचे प्रमाण पूर्वीप्रमाणेच असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत दररोज सरासरी 30 हजार लोकांची चाचणी केली जाते. एवढेच नव्हे तर ट्रॅकिंगची संख्याही वाढवण्यात आली आहे. कोरोना संक्रमित रुग्णाच्या मागे 32 लोकांचा शोध घेण्यात येत आहे. या कारणांमुळे मुंबईतील कोरोनाची साखळी तोडण्यात पालिकेला यश येत आहे.

कोरोनाची मुंबईतील स्थिती

एकूण संक्रमित - 7,33,757

डिस्चार्ज - 7,09,809 सक्रिय रुग्ण - 5799 मृत्यू- 15766

गंभीर - 557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

Threat Case: व्यावसायिकांवर धमकीचे सावट! अनोळखी क्रमांकावरून कॉल करत कोट्यवधी रुपयांची मागणी; आठवडाभरातील दुसरी घटना

Video : "अर्जुन आणि सायली, तुमचा साबण खूप slow आहे"; टीआरपी घसरल्यावर पुन्हा एकदा प्रियाची डीएनए टेस्ट !

SCROLL FOR NEXT