diseases. 
मुंबई

शहापुरात कोरोनाशी लढा सुरु असतानाच आता 'या' आजारांमुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता...

प्रकाश परांजपे

शहापूर (मुंबई) : वातावरणातील बदलामुळे शहापूर तालुक्यात साथ रोगांसह विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता आहे. आधीच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेला कोरोनासोबतच साथरोग आटोक्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार असून त्यांच्या समोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

तालुक्यात वासिंद, अघई, किन्हवली, डोळखांब, टेंभा, शेणवा, कसारा, शेंद्रुण व टाकीपठार अशी नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून पावसाळ्यात या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. तर गंभीर रुग्णांना शहापूर किंवा ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात येते. शेतकरी व मजुरांना पावसात शेतीची कामे करावी लागत असल्याने त्यांना साथरोग, साप, विंचू चावणे यांसह जलजन्य, कीटकजन्य अशा विविध आजारांचा सामना करावा लागतो.

गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जुंपली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोरोना आजारासंबंधी प्रत्यक्षात उपचार होत नसले तरी रुग्ण आढळून आलेल्या गावात संबंधित आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यामार्फत गावपातळीवर प्रतिबंधात्मक क्षेत्रात १४ दिवस सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण व इतर उपाययोजना करण्यात येतात.

आधीच कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूच्या विळख्यात असलेल्या शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह पावसाळ्यात उद्भवणारे साथ रोग माता व बाल संगोपनाच्या सेवा व लसीकरण करणे यासाठी ओढाताण होणार आहे. आधीच अपूर्ण कर्मचारी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांनावर ताण आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT