mumbai sakal
मुंबई

शिवसैनिकांकडून नवी मुंबई व पनवेलमध्ये निदर्शने

राणेंचा पुतळा जाळला; गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पनवेल (Panvel) परिसरात शिवसैनिकांनी निदर्शने केली. ऐरोली येथे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राणे यांचा पुतळा जाळण्यात आला. पनवेलमध्ये शिवसेना (Shiv sena) शाखेसमोर माजी जिल्हाध्यक्ष बबन पाटील (Baban Patil) यांच्या उपस्थितीत राणेंचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. वाशी (Vashi) येथे शिवाजी चौकात रास्ता रोको करीत पोलिसांना (Police) गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरें बाबत काढलेल्या अपशब्दाचा नवी मुंबईतील शिवसेनेची तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला. सकाळी शहरअध्यक्ष विजय माने यांच्या नेतृत्वाखाली वाशी शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच काही वेळाकरिता शिवसैनिकांनी रास्ता रोको करीत जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना रस्त्यावरून हटवले. ऐरोलीत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. नारायण राणे यांचा पुतळा जाळून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राणेंविरोधात शिवसैनिकांकडून आंदोलन सुरु असताना नवी मुंबईतील दोन्ही भाजप आमदार आणि कार्यकर्त्यांनी प्रत्‍युत्तर दिले नाही. पनवेलमध्येही भाजपकडून प्रत्युत्तर न मिळाल्याने आंदोलन विकोपाला गेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT